प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत रोबोटकडून चेंबर स्वच्छता सुरू : प्रभाग 14 मध्ये गटनेत्या आणि उपायुक्तांच्या उपस्थितीत सुरवात; नागरिकांनी केले कौतुक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून घेण्यात आलेल्या मॅनहोलची सफाई करणाऱ्या पहिल्या रोबोटकडून सांगलीतील मारुती रोडवरील भुयारी चेंबरची स्वच्छता करण्यास सुरवात करण्यात आली. 4 मे रोजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात याचे लोकार्पण करण्यात आले होते. हा रोबोट संपूर्ण सेन्सरवर ऑपरेट करता येतो. त्यामुळे ड्रेनेज चेंबरमध्ये गाळ काढण्यासाठी आता कामगारांना उतरावे लागणार नाही.
महापालिका क्षेत्रात 7 हजार हुन अधिक भुयारी चेंबर आहेत. या चेंबरमधील गाळ काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरून गाळ काढावा लागत होता. यामुळे दुर्घटना घडून कामगारांना इजा होण्याचे प्रकार घडत होते. यामुळे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका क्षेत्रातील भुयारी चेंबर स्वच्छतेची स्वच्छता अत्याधुनिक रोबोटद्वारे करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या होत्या. यानुसार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी नियोजन समितीकडून 3 नोव्हेंबर 2022 रोबोट खरेदीसाठी 39 लक्ष 52 हजाराचा निधी मंजूर करत या निधीतून जेन रोबोटिक आणि सांगली पार्टनर व्हाइस फिंच रोबोटिक कंपनीकडून हा रोबोट खरेदी करण्यात आला आहे. या रोबोटकडून आता सांगली मिरजेतील खोलवर असणाऱ्या ड्रेनेज मधील गाळ काढला जाणार आहे. यामुळे कर्मचारी खाली उतरून केली जाणारी स्वच्छता आणि यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येणार आहेत. आज आनंद टॉकीज समोर एका चेंबरची स्वच्छता या रोबोटद्वारे करण्यात आली. यावेळी सभागृह नेत्या भारती दिगडे , उपआयुक्त राहुल रोकडे, स्थानिक नगरसेवक युवराज बावडेकर, सुबराव मद्रासी, नगरसेवक उर्मिला बेलवलकर, जलानिस्सरण कार्यकारी अभियंता कुरणे, तेजस शहा, , वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर , सामाजिक कार्यकर्ते विजय साळुंखे, रवी वादवणे, सांगली पार्टनर व्हाइस फिंच रोबोटिक कंपनीच्या रुथा हेरवाडकर यांच्यासह कंपनीचे अधिकारी, टेक्निकल टीम, स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने, धनंजय कांबळे आदी उपस्थित होते.

15 दिवसात रोबोटने चेंबरमधून काढला दीड टन कचरा
दरम्यान, पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी लोकार्पण केल्यापासून सांगली मिरजेतील अनेक भुयारी चेंबरची स्वच्छता करण्यात आली. यामधून 4 मे पासून ते 25 मे या कालावधीत रोबोटकडून दीड टन कचरा चेंबर मधून काढल्याची माहिती व्हाइस फिंच रोबोटिक कंपनीच्या रुथा हेरवाडकर यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.