प्रतिष्ठा न्यूज

शामरावनगर मधील सांडपाण्याचा प्रश्न अखेर निकाली; धामणीकडे व अंकलीकडे जाणारा नाला प्रवाहित

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गेल्या कित्येक दिवसापासून पाण्याच्या वेढ्यात असलेल्या शामरावनगर मधील साचून राहणाऱ्या पाण्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. महापालिका आयुक्त सुनील पवार , उपआयुक्त राहुल रोकडे यांच्या नियोजनामुळे आणि स्थानिक नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या प्रयत्नामुळे शामरावनगर मधील नाला अंकलीच्या बाजूला खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता शामराव नगर परिसरामध्ये निचरा होत नसल्याने साचून राहणारे पाणी निचरा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात आणि भविष्यात सुद्धा मोठा पाऊस जरी झाला तरी शामरावनगर मध्ये जास्तकाळ पाणी साचून राहणार नाही याचे कायमस्वरूपी नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष शामरावनगर मध्ये साचून राहिलेल्या पाण्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आज महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत शामरावनगर ते अंकलीकडे जाणाऱ्या नाल्यामध्ये पाणी प्रवाहित करण्यात आलं. शामरावनगर स्वराज्य चौकापासून दक्षिणेकडे धामणीच्या बाजूने हा नाला जातो. यापूर्वी हा नाला शामरावनगरच्या दक्षिणेला थांबून होता पुढे शेतकऱ्यांनी जागा न दिल्यामुळे हे पाणी आजूबाजूला पसरत होते मात्र या भागाचे नगरसेवक अभिजीत भोसले, नसीमा नगरसेविका नाईक , सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक यांनी पुढाकार घेत आयुक्त सुनील पवार आणि उपआयुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार पुढील शेतमालकांशी बोलणी करून आणि संभाव्य डीपी आरक्षण लक्षात घेता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नाला पुढे वळवला . आज तो धामणे रस्त्याला अंकली नाल्याला जोडण्यात आला. त्यामुळे गेली अनेक दिवस मागे साचून राहिलेलं पाणी मोठ्या गतीने या नाल्यामध्ये प्रवाहित झाले. नाला प्रवाहित झाल्यानें हळूहळू शामरावनगरमध्ये साचून राहिलेले सर्व पाणी या नाल्याच्या मार्गाने अंकली नाल्याकडे जाणार असून यामुळे शामरावनगर मध्ये साचून राहणाऱ्या पाण्याचा प्रश्न हा जवळजवळ संपला आहे. आज नाल्यातील साचून राहिलेले पाणी प्रवाहित झाल्यानंतर स्थानिक नगरसेवक तसेच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळत होते. यावेळी जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता कुरणे, शाखा अभियंता महेश मदने , स्वच्छता निरीक्षक कोमल कुदळे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.