प्रतिष्ठा न्यूज

वैयक्तिक शौचालयासाठी नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज करा : आयुक्त सुनील पवार यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगपालिका क्षेत्रात राहणाऱ्या ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही आशा कुटुंबांनी वैयक्तिक शासनाच्या शौचालय योजनेचा लाभ घ्यावा आणि यासाठी 5 जुनपूर्वी महापालिकेकडे आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन मनपा आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.
आयुक्त पवार म्हणाले की, शासनाच्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी 17 हजाराचे अनुदान तीन टप्प्यात दिले जाते.
यामध्ये शासनाकडून 12 हजार आणि मनपाकडून 5 हजार असे अनुदान शौचालय बांधकामासाठी दिले जाते. हे अनुदान तीन टप्प्यात दिले जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाहीत अशा घरांचा सर्व्हे सुरू करण्यात आला असून
ज्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय नाही त्यानी शौचालय बांधकामासाठी 5 जून 2023 पर्यंत आपल्या भागातील
स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क साधावा आणि आपले नाव नोंद करावे असे आवाहनही आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

वैयक्तिक शौचालय अनुदानासाठी आवश्यक कागदपत्र

1)आधार कार्ड,
२) निवडणूक ओळखपत्र, 3)रेशनकार्ड 4) बँक स्टेटमेंट, 5) ज्या जागेत शौचालय बांधायचे आहे त्या जागेचा उतारा , सिटी सर्व्हे किंवा जागा मालकीचा पुरावा

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.