प्रतिष्ठा न्यूज

मेरी मिट्टी मेरा देश आणि हरघर तिरंगा अभियान सांगली महापालिका प्रभावीपणे राबविणार : आयुक्त सुनील पवार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आझादी कअमृत महोत्सव अंतर्गत 15 ऑगस्टअखेर घेण्यात आलेले मेरी मिट्टी मेरा देश आणि हरघर तिरंगा अभियान महापालिका प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
या अंतर्गत पाच फूट लांबी रुंदीचा शिलफलक उभारून त्यावर महापालिका क्षेत्रातील होतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचे नावे रेखाटण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे. वसुधा वंदन करणार आहोत. तिन्ही शहरातील अमृत वाटीकेमध्ये 75 देशी वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. पंच प्राण शपथ 9 ऑगष्ट पासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी 70 शाळांमध्ये शपथ घेण्यात आली. प्रभाग समिती स्तरावर माती संकलनासाठी कलश ठेवले जानार असून ते कलश महापालिका मुख्यालय येथे एकत्र करून तिथून ते कलश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत. याचबरोबर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अभियानांतर्गत सर्वांनी आपल्या घर, व्यवसाय ठिकाणी भारतीय ध्वज लावायचा आहे. हे ध्वज पोष्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असून सर्वांनी खरेदी करावेत असे आवाहनही आयुक्त सुनील पवार यांनी यावेळी केले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील आणि उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.