प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समिती निकृष्ट बांधकामाची दुबार तपासणी सुरू : संचालक महादेव पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारीत बेदाणा मार्केट मधील निकृष्ट बांधकामाची दुबार तपासणी शुक्रवारी सुरू झाली आहे.  गणपती कन्सल्टंट सांगली यांच्यामार्फत याची तपासणी सुरू आहे.यावेळी बाजार समिती संचालक महादेव नाना पाटील,आर डी पाटील,पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांनी पाहणी करत कामाची माहिती घेतली.
या बांधकामाचा अहवाल अशोक भिलवडे कन्स्लंटींग इंजिनियर सांगली यांनी तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे विस्तारीत बेदाणा मार्केट मधील बांधकामाची तपासणी करुन अहवाल बाजार समितीकडे सादर केलेला होता.तथापि त्यांनी केलेला तपासणी अहवाल मान्य नसलेचे कारणाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून तपासणी करुन घ्यावी अशी कुबेरा कन्स्ट्रक्शन प्रा.लि. सांगली यांनी मागणी केली होती.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सांगली यांनी सदर तपासणी करणेस लेखी पत्राद्वारे असमर्थता दर्शविली आहे.बाजार समितीने विजयकुमार गणपतराव पाटील प्रो.पा.गणपती कन्स्लटन्सी सांगली यांचेकडून दुबार तपासणी करुन घ्यावी,कुबेरा कन्स्ट्रक्शन प्रा.लि. सांगली व चौगुले पाटील कन्सलटंट प्रा.लि.यांना वारंवार कळवूनही ते बांधकाम तपासणीसाठी उपस्थित रहात नसलेचे निदर्शनास आले.तरी बाजार समितीने सदर बांधकामाची दुबार तपासणी तात्काळ करुन घेऊन अहवाल आठ दिवसाचे आत प्राप्त करुन घ्यावा.व अहवालानुसार पुढील कार्यवाही करावी.आपण करीत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल  सादर करावा असे आदेश डीडीआर यांनी दिले होते.याची दुबार तपासणी शुक्रवारी गणपती कन्सल्टंट सांगली यांच्यामार्फत सुरू झाली.यावेळी बाजार समिती संचालक महादेव नाना पाटील,आर डी पाटील,पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांनी पाहणी केली.सुरू असलेल्या तपासणी कामाची माहिती घेतली.हे काम किती रकमेचे झाले आहे त्या कामास वापरलेले मटेरियल या व अन्य गोष्टींची तपासणी होणार आहे. बाजार समिती संचालक व काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी या निकृष्ट बांधकाम प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.