प्रतिष्ठा न्यूज

शामरावनगर येथील नालेसफाई आठ दिवसात पूर्ण करा : आयुक्त सुनील पवार यांचे कंत्राटदाराला आदेश: नाले सफाई कामाचीही केली पाहणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व नालेसफाई कामाची पाहणी आज आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी केली. यामध्ये शामरावनगर येथील नालेसफाई येथे यंत्राच्या सहायाने सुरू असलेल्या नाले सफाई कामाच्या ठिकाणी आयुक्त सुनील पवार यांनी भेट देत शामरावनगर येथील नालेसफाई आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील 65 हजार मीटर लांबीचे नाले मान्सूनपूर्वी स्वच्छ केले जाणार आहेत. या मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला दोन दिवसापूर्वी सुरुवात झाली आहे. यामध्ये यांत्रिकी सहाय्याने नालेसफाई केली जाणार असून संपूर्ण नालेसफाईवर ड्रोन कॅमेराद्वारे वॉच राहणार आहे. मान्सूनपूर्वीच मनपा क्षेत्रातील सर्व नाले गाळमुक्त होणार असल्याने संभाव्य आपत्ती उद्भवल्यास शहरातील पाणी तातडीने निचरा होण्यास मदत होणार आहे. या सुरू असणाऱ्या नालेसफाई कामाची पाहणी आज महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी केली शामराव नगर येथील नालेसफाईच्या कामाला आयुक्त सुनील पवार यांनी भेट देत सदर भागातील नालेसफाई आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश संबंधिताला दिले.
यावेळी उपायुक्त राहुल रोकडे , आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, स्थानिक नगरसेवक अभिजीत भोसले, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, शहर अभियंता परमेश्वर अल्कुडे, शाखाअभियंता महेश मदने, पाणी पुरवठा विभागाचे अमीर मुलाणी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, निरीक्षक कोमल कुदळे, नालेसफाई कंत्राटदार स्वप्नील सर्जे, विलास सर्जे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.