प्रतिष्ठा न्यूज

कै.गणपतराव मेगदे गुरूजी स्मृती व्याख्यानमालेचे दि.2 फेब्रुवारी रोजी आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार

 नांदेड दि.1 : जुन्या पिढीतील कर्तव्यदक्ष आपल्या विद्यार्थ्यांच्या जाणीवा रुंदावण्याचा सतत ध्यास घेणारे आणि विविध कलामध्ये रुची असलेले कै. गणपतराव उर्फ बापूसाहेब मेगदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ मागच्या दहा वर्षापासून त्यांच्या पुण्य स्मरणार्थ दिनानिमित्त यमुना प्रतिष्ठान मुदखेड च्या वतीने दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
यावर्षी ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे हे “भारतीय समाज रचना व प्राचीन शैक्षणिक परंपरा “या विषयावर बोलणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश व्ही. नाव्हेकर हे भूषविणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडच्या श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर यशवंत व्ही जोशी यांची उपस्थिती लाभणार आहे .
या कार्यक्रमात नांदेडचे सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉक्टर लक्ष्मीकांत लव्हेकर यांचा अविरत आरोग्यसेवा व समाज जागरण कार्यासाठी तसेच सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अविरत सेवा कार्यासाठी यमुना प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येकी शाल श्रीफळ व सन्मानचित्र आणि रुपये 11000 रोख राशी देऊन गौरव करण्यात येणार आहे. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठिक 6 वाजता कुसुम सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात नांदेडकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा व व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आव्हान यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. उमेश मेगदे आणि सचिव उद्योजक रमेश मेगदे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.