प्रतिष्ठा न्यूज

तासगाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महिलांसाठी मोफत शौर्य प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबिराचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगाव यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती व 350 वा शिवराज्याभिषेक दिनाचे निमित्ताने तासगाव शहर व परिसरातील महिलांच्यासाठी मोफत शौर्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचें आयोजन करण्यात आले आहे,तरी जास्तीत जास्त मुली, माता-भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.शिबीर कालावधी दि.23 मे पासून 30 मे पर्यंत असून शिबिराचीं वेळ सकाळी 6.30 तें 9.45 आहे. शिबिराचे ठिकाण चंपाबेन वाडीलाल ज्ञान मंदिर मैदान असून,यासाठी वयोगट 12 तें 25 असून शिबिरात येणाऱ्या प्रत्येकास नाव नोंदणी आवश्यक आहे.यामध्ये लाठीकाठी, एअर रायफल शूटिंग,चक्रीपाश,इंडियन मार्शल आर्ट याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.तरी जास्तीत जास्त मुली महिला व माता भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.