प्रतिष्ठा न्यूज

एल आय सी एजंटाचे विविध मागण्यासाठी देगलूर येथे असहकार आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड : देगलूर येथे जूना मोंढा एल आय सी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी एल आय सी प्रतिनिधी ( एजंट) यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.
आज देगलूर शहरामध्ये एल आय सी जीवन विमा निगम विरोधात देशव्यापी असहकार आंदोलन ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया  लियाफी शाखा – देगलूर 95D, नांदेड विभाग एल आय सी भारतीय जीवन विमा निगम शाखा देगलूर च्या वतीने एल आय सी कार्यालयासमोर (देगलुर) संपूर्ण एजंट आंदोलन करीत आहे *अध्यक्ष – गंगाप्रसाद माळवे* यांच्या नेतृत्वाखाली दिनांक –  1-9 2022 ते दिनांक 30-11-2022 या कालावधीत ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन इंंडीयाच्या वतीने शाखा कार्यालय देेगलुुर समोर विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन होणार आहे. असे सूचित करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली .भारतीय एलआयसी जीवन विमा निगम ची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस एल आय सी चा प्रचार करण्यासाठी एजंटांना खूप मोठा त्रास होत होता परंतु एजंटांनी वाहन नव्हते, इंटरनेट सुविधा नव्हती तरीही फक्त एजंटमार्फत एल आय सी चा प्रचार करून एलआय सी चे फायदे कशा पद्धतीने मिळवता येतील नागरिकांना समजावून, पटवून एल आय सी भरून घेण्यात येत होते एजंट पायपीट करत गावागावात शहरात प्रत्येक  जाती जमाती मध्ये जाऊन  एलआयसी चे काय फायदे राहतात लाभार्थ्यांचे लक्षात आणून देण्यासाठी आठ ते दहा वेळा त्यांच्या घराच्या चकरा मारत एलआयसी एजंट फिरत होते तेव्हा सायकल मोटार ही नव्हती सायकली वर जाऊन तो व्यक्ती एल आय सी भरण्यासाठी जागृत होत होता तर आता ऑन  लाइन इंटरनेट मार्फत एल आय सी विमा भरण्याचे काम एल आय सी करत आहे. त्यामुळे एजंटाला डावलण्यात येत आहे व त्यांचे पूर्ण लाभ एजंटाला मिळत नाही त्याच्यासाठी संपूर्ण देशात फार मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. एजंटांचे विशेष मागणी महणजे एल आय सी एजंट कमिशन वाढवून मिळावे, पॉलिसी धारकांच्या मिळणाऱ्या बोनस दरात वाढ होणे कर्जावरील व्याज दरात कमी करण्यात येणे लेट फीस वरील जी एस टी हटवणे,  एजंटांची ग्रॅज्युटी वाढवण्यात येणे,
तीन लाखापासून ते वीस लाखापर्यंत देण्यात येणे एजंटांचा मेडिक्लेम सुविधा वाढून मिळण्यात येणे अॅक्ट 44 अनुसार रद्द करण्यात आलेली एजंटांच्या  मृत्यूनंतर वारसाला कमिशन देण्यात यावी, एल आय सी एजंट 40 ते 50 वया गटात काम करतील परंतु त्याच्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचा चालण्यासाठी एलआयसी जीवन विमा निगम पेन्शन योजना लागू करून देण्यात यावी असे अनेक विशेष मागण्या आहेत असे देगलूर एल आय सी जीवन विमा निगम लियाफी चे *अध्यक्ष गंगाप्रसाद माळवे* यांनी सांगितले व संपूर्ण विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या आंदोलनात  उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे,सह सचिव पि. जे. कांबळे, व्ही.एस.कम टलवार, अहमद खान पठाण नरेश-याकावार(विभागीय सहसचिव),झरीकर यादवराव महाराज, असे सहाशे एजंट देशव्यापी असहकार आंदोलनामध्ये सहभागी आहेत. जोपर्यंत पर्यंत हे पूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हापर्यंत आंदोलन चालू राहील, संघर्ष चालू राहील असे यावेळी बोलताना एजंटांनी आमच्या वार्ताहारांशी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.