प्रतिष्ठा न्यूज

जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात राजर्षी शाहू विद्यालय शाळेची जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून हॅट्रिक: माध्यमिक गटातून पटकाविला सतत दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
 नांदेड : संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज, वसंतनगर शाळेतील विद्यार्थी संचीत शंकरराव नेव्हल यांने साकारलेल्या आधुनिक काळातील स्मार्ट होम या प्रयोगाला जिल्ह्यात  माध्यमिक स्तरावर  प्रथम क्रमांक मिळाला आहे. दि.१५ ते २० जानेवारी रोजी होत असलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी राजर्षी शाहू विद्यालय या शाळेची निवड करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद माध्यमिक गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
    जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड आणि
संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.४ व ५ जानेवारी रोजी सगरोळी ता. बिलोली येथे पार पडले. यावेळी नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज माध्यमिक गटातून आधुनिक काळातील स्मार्ट होम,सोलार ऊर्जा वापर  या प्रयोगाचे सादरीकरण इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी संचीत शंकरराव नेव्हल या प्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
या प्रयोगास जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बालाजी हंगरगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र,पुष्पहार देऊन विद्यार्थी संचीत नेव्हल याचा सत्कार करण्यात आला.
या प्रयोगासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी.एम.हंगरगे, उप मुख्याध्यापक श्री पांडुरंग यमलवाड,पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत, विज्ञान शिक्षक शिवानंद टापरे,आनंद मोरे,श्री गोपाळ मोरे,श्री रत्नाकर कोत्तापल्ले यांनी मार्गदर्शन केले.
    या यशाबद्दल  बाल वैज्ञानिक विद्यार्थी संचीत नेव्हल आणि राजर्षी शाहू विद्यालयाचे  सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
         गतवर्षी   संचित नेव्हल यांच्या सौर ऊर्जेचा वापर करून ” मळणी यंत्र ” या प्रयोगास प्रथम क्रमांक पटकावला होता.त्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सतत दोन वर्षी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकावून राजर्षी शाहू विद्यालयाने हॅटट्रिक साधली आहे.प्रतिष्टा न्यूज पोर्टल च्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.