प्रतिष्ठा न्यूज

सांगली कोर्टासमोरील गोविंद प्लाझा या धोकादायक इमारती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल : प्रकाश चव्हाण यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील वानलेसवाडी परिसरात कोर्टासमोर नैसर्गिक नाल्यावर अनाधिकृतपणे नाल्याची रुंदी कमी करत, त्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून,ओपन स्पेस वर अतिक्रमण करत तसेच अनेक वर्षांपासून असलेली विहीर बुजवून त्या विहिरीवरच अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेली गोविंद प्लाझा ही बहुमजली इमारत धोकादायक असून ती या इमारतीमधील व्यवसायिकांसह,याठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी जीवघेणी ठरू शकते. या विरोधात संतोष भोसले यांच्या नावाने मुंबई उच्च न्यायालयात १३ जणांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सदरची बेकायदा इमारत हटविण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान सदर नाल्याची रुंदी 35 ते 40 फूट असताना सध्या या ठिकाणी आठ ते दहा फूट इतकीच ती शिल्लक आहे. पावसाळ्यात कुपवाड पासून येणारे पाणी या ठिकाणी कमी रुंदीमुळे फुगून नागरी वस्तीत शिरते .त्यामुळे इथले जनजीवन विस्कळीत होते. हा नाला वळवण्याची परवानगी कोणी आणि का दिली? सदर बांधकामासाठी प्रमाणपत्र कसे देण्यात आले? याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पुन्हा एकदा सांगली महानगरपालिकेचा दुर्लक्षित आणि गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. या व्यवहारात बिल्डरला पाठीशी घालण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. सदर बिल्डरच्या बाबतीत तक्रार करूनही कोणीही दाद घेत नाही.परंतु येत्या तीन महिन्यांत बिल्डरवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे तसेच या विरोधात हरित न्यायालयात दाद मागितल्याचे व सदर न्यायालयाने संबंधित बिल्डरला नोटीस पाठवल्याचेही प्रकाश चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याविषयी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, नगर रचना विभाग, जेपी डेव्हलपर्सचे महेश पाटील, बबन लोटो यांच्यासह १३ जणांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.