प्रतिष्ठा न्यूज

वाचनहिताय अभ्यास शिबीर बेलवडे येथे संपन्न

प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
सांगली:  वाचनहिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,वाटेगांव आयोजित वाचनहिताय अभ्यास शिबीर,बेलवडे येथे पार पडले.वाचनहिताय अभ्यास शिबीरामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून श्री बह्मदास महाराज मठ बेलवडे येथील मंदिर परिसर,मंदिर पाठशाळा स्वच्छता करण्यात आली.विद्यार्थ्यांना एम.आर.पाटील यांचेकडून शिक्षण, आध्यात्म याविषयी मार्गदशन मिळाले.दुपारच्या सत्रात भोजन त्यानंतर वाचन परिपाठ, प्रश्नमंजूषा, हरिपाठ, मनाचे श्लोक आि उपक्रम घेण्यात आले. या शिबिराची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.या शिबीरास उदय बर्डे,महेश राजमाने,दत्तात्रय पंडित,विजयकुमार पाटील,एम.आर.पाटील,डॉ.जयराज पाटील,सुनंदा वेदपाठक,संगिता वेदपाठक व श्री बह्मदास मंदिर ट्रस्ट यांचे सहक लाभले.यावेळी अध्यक्ष राहुल वेदपाठक,उपाध्यक्ष एम.आर.पाटील,भिमराव यादव,चैतन्य बागवडे, संजय पाटील,रामचंद्र देसाई,संजय जंगम इ.उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.