प्रतिष्ठा न्यूज

२६/११ च्या शहिदांना रक्तदान शिबीरा द्वारे अनोखी श्रध्दांजली

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडल कळंबे तर्फ कळे संचलीत आनंदी कॉलेज ऑफ फार्मसीच्या एन्.एस.एस युनिट च्या वतीने २६/११ रोजी शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीरा मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देसाई व सचिव डॉ.विद्या देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डाॅ पिशवीकर , उपप्राचार्य डॉ. राहुल अडणाईक, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची व वैभविलक्ष्मी ब्लड बँकच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली. कार्यक्रमाचे नियोजनासाठी NSS युनिटच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.