प्रतिष्ठा न्यूज

श्री शिवराज्याभिषेक दिन हा भारतवासियांसाठी प्रेरणा दिवस : प्रकाश बिरजे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : “हजार वर्षांच्या मोगलांच्या गुलामगिरीतून महाराष्ट्राला मुक्त करून श्री. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होणे हा हिंदू समाजासाठी गौरवाचा दिवस होता. हजार वर्षात जे कुणाला जमले नाही, असे राज्याभिषेकाचे साहस श्री. शिवछत्रपती महाराजांकडे होते. बारा बलुतेदारांमध्ये स्वराज्याचे बीज पेरून त्यांच्यातूनच सैन्य निर्माण करून हे यश त्यांनी संपादन केले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. याप्रसंगीच राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. हजार वर्षाची गुलामगिरी संपुष्टात आणून स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला हा भारताच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली दिवस होय.” असे उद्गार भाजपचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री. प्रकाशतात्या बिरजे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काढले. यावेळी श्री. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व आनंदोत्सव साजरा करून नागरिकांना मिठाई वाटण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, संघटन सरचिटणीस दीपक माने, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, सभापती धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील, नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर अप्सरा वायदंडे, दारीबा बंडगर, पृथ्वीराज पाटील, रवींद्र सदामते, शीतल कर्वे, रघुनाथ सरगर, अतुल माने, सुभाष गडदे, बाळासाहेब पाटील, श्रीकांत वाघमोडे, अविनाश मोहिते, सुनील माणकापुरे, उदय मुळे, कृष्णा राठोड, अमित देसाई, चेतन माडगुळकर, महेश सागरे, गणपती साळुंखे, प्रीती मोरे, वैशाली पाटील, हेमलता मोरे, माधुरी वसगडेकर, मीना कोळी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.