संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 15 : संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात त्यांच्या प्रतिमेस जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.