प्रतिष्ठा न्यूज

सावळजमधील वंचीत भागाला हक्काचे पाणी देणेचा प्रयत्न – खा.संजयकाका पाटील ; सांगलीत पाटबंधारे विभागातील शेतकरी बैठकीत या भागाला पाणी देण्याासाठी सर्व्हे करण्याचे आदेश

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे

सावळज : सावळज ता.तासगाव येथील अनेक वर्षे हक्काच्या पाण्यापासुन कायमस्वरुपी वंचीत भागाला शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न करु असे प्रतिपादन सांगली लोकसभेचे खा.संजयकाका पाटील यांनी केले.सावळजमधील पळसाडी तलावातील पवार खोरा व बसवेश्वर नगर भागातील शेतकऱ्यांची वारणाली,सांगली येथे पाटबंधारे अधिकारी समवेत बैठक झाली,त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाला या वंचीत भागाला पाणी देण्याासाठी सर्व्हे करण्याचे आदेश दिले.

खा.संजयकाका पाटील म्हणाले की,सावळज मध्ये टंचाई काळात नेहमी शेतीचा पाणीप्रश्न उद्भवतो.सावळजमधील पळसाडी तलावातील पवार खोरा व बसवेश्वर नगर भागातील लोकांना तात्पुरते दुसरेचे वाटेचे किंवा जवळ आले आहे,म्हणुन तेथील पाणी देऊन फसवणुक होण्यापेक्षा कायमस्वरुपी हक्काचे शाश्वत पाणी देऊन या भागातील इतरही वंचीत भागाला पाणी देणेचा प्रयत्न करु.लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी काहीतरी करणे,हा माझा स्वभाव नाही.या वंचीत भागाला गव्हाण उपसा सिंचन योजनेतुन पाणी देणेला अनेक तांत्रीक अडचणीमुळे मर्यादा आहेत.तरी टेंभुच्या पाचव्या टप्प्यातुन विस्तारीत पाईपलाईनमधुन पाणी देणेबाबत सर्व्हे करुन परत आपण म्हैशाळ की टेंभु या बाबत निर्णय करु.

सावळजमधील पळसाडी तलावातील पवार खोरा व बसवेश्वर नगर भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तासगाव-कवठेमहांकाळचे भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात या भागाला भेट दिली होती. या भागाला पाणी कसे देता येईल याबाबत त्यांनी सर्व्हे करणे आदेश दिले होते. त्यानंतर सांगली येथे पाटबंधारे विभागात खासदार संजयकाका पाटील व पाटबंधारे अधीकारी यांचे सोबत बैठक त्यांनी बैठक लावली.यावेळी या भागातुन मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पाटबंधारे अधिक्षक अभियंता पाटोळेसो,टेंभु योजनेचे रासनकरसो व हारुगडेसाो ,म्हैशाळ योजनेचे कोरेसो व डवरी सो उपस्थित होते.यावेळी पै ऋषिकेश बिरणे,सुखदेव आबा पाटील,बि.एस.पाटील,योगेश पाटील,सुरेश निकम,दत्तात्रय पवार,शिवराज निकम,गुंडा निकम,जालिंदर जाधव,शहाजी पवार,आप्पासो निकम,बाळासो थोरात,सुशांत निकम,वसंत मिरजे,रावसाहेब गरड,दादासो पवार,संभाजी निकम,तानाजी थोरात,महादेव गरड,सलिम मुलाणी,जगन्नाथ माने,नारायण पवार,चंदु थोरात,सुनिल भोसले,सुरज निकम,बाळासो पाटील,तसेच भाजप पदाधीकारी, सोसायटी संचालक मंडळ व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.