प्रतिष्ठा न्यूज

मिरजेतील महाराष्ट्र शासनाची जागा महापालिका अधिकारी व तत्कालीन नगरसेवकांनी संगनमताने चुकीच्या पद्धतीने लिलाव करून विकली ; तक्रार आम आदमी पार्टीची तक्रार

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : मिरजेतील महाराष्ट्र शासनाची असणारी जागा महापालिका अधिकारी व तत्कालीन नगरसेवक यांनी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने लिलाव करून विकल्याची तक्रार आम आदमी पार्टी सांगलीतर्फे करण्यात आली होती. याचे सर्व पुरावे सादर करून संबंधित अधिकाऱ्यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक दिवस आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत काही कारवाई झाली नाही. तसेच मिरजेतील अलंकार कॉलनी येथील १६ लाख रुपये इतका खर्च दाखवून रस्ताच केला नाही, महापालिका क्षेत्रातील पार्किंग स्पेसचा दुरुपयोग करून पार्किंगची जागा विकणारे हॉस्पिटल व बांधकाम व्यावसायिक यांच्या वर प्रलंबित असणारी कारवाई इत्यादी अनेक विषयांवर महानगर पालिका आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा सोमवार दिनांक ०४.११.२३ रोजी मिरज महानगर पालिके समोर आम आदमी पार्टीच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा पक्षाचे नेते वसीम मुल्ला यांनी दिला आहे. त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे सांगली जिल्हा शहर समिती अध्यक्ष आरिफ मुल्ला, उपाध्यक्ष संभाजी मोरे, इमरान पठाण व संतोष मगदूम हे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.