प्रतिष्ठा न्यूज

सर्वोत्कृष्ठ बालकलाकार पुरस्काराने आदित्य म्हमानेचा मुंबईत चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे यांच्या हस्ते सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : मुंबई येथे आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजित राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात कोल्हापूरचा बालकलाकार आदित्य म्हमाने याचा सर्वोत्कृष्ठ बालकलाकार म्हणून सन्मान करण्यात आला. या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात देशभरातून शंभरहून अधिक लघुचित्रपटांचा सहभाग होता व दोनशेहून अधिक बालकलाकार सहभागी झाले होते.
आदित्य म्हमाने याने मुजरा, बुद्धा, निबंध या सह अनेक लघुचित्रपटात लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. त्याच्या या विशेष कार्याची दखल घेऊन आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, कुटुंब रंगलंय काव्यात फेम प्रा. विसुभाऊ बापट, अभिनेते संजय खापरे, चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे, हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरे, रात्रीस खेळ चाले फेम प्राजक्ता वाडये, संजीवनी पाटील, अभिनेत्री सिद्धी कामथ, दिग्दर्शक सुहास कर्णेकर, धर्मवीर फेम मकरंद पाध्ये, दिलीप दळवी, खालील शिरगांवकर, विलास चौकेकर, अमन दळवी आदी मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ बाल कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले.
सदर महोत्सवाचे संयोजन सिनेअभिनेते, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, अभिनेते अनंत सुतार, निर्माता सुरेश डाळे, मनिष व्हटकर यांनी होते.
सदर महोत्सवाचे निवेदन शशिकांत खानविलकर यांनी केले तर यावेळी उत्कृष्ट ढोलकी वादक लक्ष्मी लांबे-कुडाळकर व उत्कृष्ट महिला संबळ वादक गौरी वायचळ-वनारसे यांची जुगलबंदी विशेष आकर्षण होते.
सदर महोत्सवात अजित शाह, गुरुनाथ तिरपणकर, एन. डी. खान, रघुनाथ ढोक, अमोल वंजारे, प्रसाद कडव, राहुल खरात, संदीप जाधव, विजयभाऊ पाटील, पराग चव्हाण, डॉ. पद्माकर तामगाडगे, विजया कांबळे, अमर पारखे यांच्यासह या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवास देशभरातून मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.