प्रतिष्ठा न्यूज

मराठा आरक्षण ही भाजप महायुतीची वचनपूर्ती : आमदार सुधीरदादा गाडगीळ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली 27 : मराठा आरक्षण मिळावे पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक इच्छा होती मागच्या युती शासन काळात नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमून सर्वांगीण अभ्यास करून मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यात आली तथापि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवनीस, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार या त्रिमूर्तीने अविरत कष्ट घेऊन या मागणीचा पाठपुरावा केल्याबद्दल मराठा समाज नक्कीच त्यांना धन्यवाद देईल ठाकरे राजवटीत हा विषय मागे पडला होता पण श्री मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर सर्व महाराष्ट्रात राहण उठवले आणि आज त्याची यशस्वी सांगता केली. याबद्दल श्री मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून अभिनंदन.. मराठा आरक्षण आंदोलनात अनेक तरुणांचा मृत्यू झाला काहीनी आत्महत्या केली. त्या शहीद वीरांना मी हृदयपूर्वक वंदन करतो, अशी भावना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केली मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याबद्दल आमदार गाडगीळ कार्यालय समोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे व साखर वाटप करून जल्लोष केला. यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेवक युवराज बावडेकर, पांडुरंग कोरे, बाळासाहेब पाटील, विश्वजीत पाटील, शहाजी भोसले, विनायक शिंदे, किरण भोसले, चेतन माडगूळकर, दरिबा बंडगर, जयवंत पाटील, रवींद्र ढगे रवींद्र सदामते, सुभाष गडदे, गणेश चौगुले, निलेश निकम, राजू आवटी, मोहन वाटवे, अभिजीत लाड, अनिकेत खिलारे, प्रथमेश वैद्य आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.