प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 67 लाखांवर अभिलेखे तपासणी – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी; आतापर्यंत 12 हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 16 (प्रतिनिधी) : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 15 नोव्हेंबरअखेर एकूण 67 लाखांवर अभिलेखे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 12 हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले. कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अजय पवार काम पाहात आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावरील विशेष कक्षांमार्फत 15 नोव्हेंबरअखेर एकूण 67 लाख 46 हजार 270 नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 12 हजार 803 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा कारागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, भूमिअभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महापालिका जन्म मृत्यू रजिस्टर, नगरपालिका प्रशासन, उपवनसंरक्षक कार्यालय अशी 11 शासकीय कार्यालयातील विविध अभिलेखे, तसेच 1967 पूर्वीचे अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तक-सेवा अभिलेखे तपासण्यात आले. यामध्ये महसूल विभागांतर्गत 10 तहसील कार्यालये व 1 अप्पर तहसील कार्यालयाचे 22 लाख 43 हजार 918 नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये 9 हजार 731 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या. अन्य कार्यालयांतून 45 लाख, 2 हजार, 352 नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये 3 हजार 72 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.