प्रतिष्ठा न्यूज

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा !* – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांच्या घरावर, खाजगी मालमत्तेवर लावलेले धार्मिक ध्वज काढण्याचे प्रकार झाले आहेत. 22 जानेवारी या दिवशी अयोध्या येथे झालेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घरावर भगवे ध्वज लावले आहेत. या ध्वजाचा लोकसभा आचारसंहितेशी काहीही संबंध नसताना नाहक हे ध्वज काढणे, अयोग्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, महाराज प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे , श्री. सचिन पवार, श्री. सागर रांगोळे, श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल नागटिळक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, भगवा ध्वज हा कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसून तो हिंदु धर्माचे धार्मिक प्रतीक आहे. निवडणूक आचारसंहिता ही निवडणूक लढवणारे उमेदवार, राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांना लागू होते. ती सर्वसामान्य व्यक्तीच्या धर्माचरणावर निर्बंध आणू शकत नाही. घरावर भगवा ध्वज लावणे हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार समजला जाऊ शकत नाही. तसे समजून जर तो ध्वज काढण्याची कृती केली गेली, तर तो हिंदूंच्या धार्मिक आचरणावर गदा आणण्यासारखे होईल. तरी आचारसंहितेचे पालन करतांना घरावरील भगवे ध्वज काढण्याची नियमबाह्य कृती करण्यास तात्काळ थांबवण्याचे आदेश महानगरपालिकेच्या, नगरपालिका, ग्रामपंचायत, तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित कर्मचार्‍यांना निर्गमित करावेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.