प्रतिष्ठा न्यूज

बिसूर व बामणोली गावातील तीर्थक्षेत्रासाठी प्रादेशिक पर्यटन विकास निधी मधून ३ कोटी ४३ लाख निधी मंजूर : आमदार सुधीरदादा गाडगीळ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली १८ : सांगली विधानसभा क्षेत्रातील बिसूर गावातील श्री. दत्त मंदिर व बामणोलीचे श्री. भैरवनाथ मंदिरासाठी व मंदिर परिसराच्या विकास कामासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक पर्यटन स्थळामधे समावेश करून प्रादेशिक पर्यटन विभागामधून मंदिराच्या विकासासाठी ३ कोटी ४३ लाख इतका निधी मंजूर करून घेतल्याबद्दल बामणोली ग्रामपंचायतीच्या वतीने व श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या संचालकांच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा नागरी सत्कार करून आभार मानण्यात आले. सदरच्या प्रादेशिक पर्यटन निधीमधून तसेच मंदिराच्या परिसरातील रस्ते काँक्रीटकरण करणे तसेच पथदिवे बसविणे या आदि विकास कामाचा समावेश असून यामुळे यागावातील नागरिक तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या निधीमुळे गावाच्या पर्यटन विकासात भर पडणार आहे.
यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपा जेष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, बामणोली गावच्या सरपंच सौ. गिताताई चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, ग्रामपंचायत सदस्य राजेश सन्नोळी, संतोष सरगर, अर्चना पाटील, संगीता पाटील, सुनिल पाटील, उमेश वारणकर, श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे संचालक रमेश शिंदकर, शशिकांत शिंदकर, सतिश शिंदकर, राम शिंदकर व संदिप शिंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कामासाठी बामणोली ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.