प्रतिष्ठा न्यूज

खाडे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या शिष्यवृत्ती परीक्षेत खाडे इंग्लिश स्कूलच्या अभेद्य कांबळे याने ३००पैकी २५० गुण मिळवून शहरी भागात १३ वा क्रमांक तर अनुष्का चव्हाण ३०० पैकी २१८ गुण संपादन करत  ९७ वा क्रमांक पटकावून शाळेच्या किर्तीमध्ये मनाचा तुरा खोवला आहे. या यशामागे त्यांना शिक्षिका माधुरी कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष, राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे, कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांना संचालिका सुमन खाडे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.