प्रतिष्ठा न्यूज

लोह्यात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या निवडी व कार्यकर्ता पक्ष प्रवेश मेळावा संपन्न

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- लोहा येथे शिवसेना (शिंदे) गटाचे उपजिल्हा प्रमुख- बाळासाहेब पाटील कराळे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जनसंपर्क कार्यालयात दि.18 मार्च 2024 रोजी लोहा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी व कार्यकर्ता पक्ष प्रवेश  मेळावा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख- बाळासाहेब पाटील कराळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा- गीताताई पुरोहित यांची उपस्थिती होती.
यावेळी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी उपस्थितांच्या हस्ते निवड पत्र देऊन करण्यात आल्या.
यात शिवसेना तालुकाप्रमुख- मिलिंद पाटील पवार यांना बढती देण्यात येऊन त्यांच्याकडे शिवसेना लोहा-कंधार विधानसभा प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच खंडोजी अकोले यांची लोहा-कंधार विधानसभा संघटकपदी निवड करण्यात आली.
दक्षिण लोहा तालुकाप्रमुखपदी- संतोष पाटील यंडाळे  तर उत्तर लोहा तालुकाप्रमुखपदी- नागोराव पाटील सिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच लोहा तालुका संघटकपदी- विनायक पाटील भरकडे तर युवा सेनेच्या कंधार तालुकाप्रमुखपदी- अमोल पवळे चिखलीकर, तसेच शिवसेनेच्या लोहा शहरप्रमुखपदी- सतीश आणेराव यांची निवड करण्यात आली.
यावेळी माळेगाव येथील महिला कार्यकर्त्यां अर्चनाताई घोरपडे यांनी शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राजश्रीताई, महेश कराळे, मकरंद पवार, गणेश मोरे, शिवराज मुंडकर, सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.