वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी इंजर प्रथम
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.21 : गगनबावडा येथील मुरलीधर वाचन मंदिर च्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात कुमारी श्रावणी महादेव इंजर हिचा प्रथम क्रमांक आला. ती तिसंगी येथील दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. तिला प्राचार्य व्ही डी पाटील, वर्ग शिक्षक एच एस सुतार, व आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.