प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू बालक मंदिर शाळेत चिमुकल्यांची दहीहंडी उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि. 21 : शहरातील वसंतनगर येथील राजर्षी शाहू बालक मंदिर शाळेत चिमुकल्या, बाल विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण गोकुळ आष्टमिनीमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
चिमुकल्या बाल विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधा, गौळणी यांच्या आकर्षक वेशभूषे मध्ये विविध नृत्य, गीत सादर केले. त्यामुळे विद्यालयात चिमुकल्यांनी अप्रतिम गीतांचे सादरीकरण केल्यामुळे प्रति गोकुळ अवतरले होते. उपस्थित पालकांनी,प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी बाल, गोपाळांनी, विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडल्या नंतर सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मराठवाडा शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा संचालक श्री सी. एम. सोनवणे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री बी. एम. हंगरगे, प्रा. डॉ तुकाराम जाधव, मु. अ. श्री बी. डी. देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवानंद टापरे, वरिष्ठ क्लार्क वैजनाथ आर्दड यांच्या सह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहीहंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती ढेंगळे, श्रीमती पुष्पा मुदीराज, श्रीमती वसुधा खपले, श्रीमती कंधारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.