प्रतिष्ठा न्यूज

२२ जुलैला मिरजेत होणार जिल्हा स्तरीय निवड चाचणी स्पर्धा २०२३-२४

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि विश्वयोगदर्शन केंद्र सांगली मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा योगासन निवड चाचणी स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन केले आहे. या स्पर्धा दि.२२ जुलै आणि २३ जुलै २०२३ रोजी, सकाळी ०९.०० वाजता, व्ही.पी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सभागृह,भारती हॉस्पिटल जवळ,सांगली मिरज रोड, मिरज येथे घेण्यात येणार आहेत.
 याची नावनोंदणी खालील गूगल फॉर्म वरती भरण्यात यावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdh_dRu6yZk4LKWAwxzi5OVX1Iy_XEWhR38FjWyh2hLDLWjWA/viewform  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धेच्या दोन दिवस आधी पर्यंत म्हणजे दि.२० जुलै २०२३ पर्यंत महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स गुगल फॉर्म लिंक वरती  नोंदणी करणे आवश्यक आहे.
(स्पर्धेच्या दिवशी  नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.)
          तसेच स्पर्धेसाठी पोशाख मुले व पुरुष यांच्यासाठी हाफ पॅंट,  टि-शर्ट, मुली व महिला यांच्यासाठी योगा कॅाश्च्यूम किंवा स्लॅक्स आणि टि-शर्ट असा राहील. स्पर्धकाचे वय दिनांक ३१/०३/२०२३ पर्यंतचे पाहिले जाईल. स्पर्धेसंबंधी माहिती पुढीलप्रमाणे, स्पर्धा पुढील चार प्रकारात होईल
१) ट्रॅडिशनल योगासन २) आर्टिस्टिक योगासन सिंगल ३) आर्टिस्टिक योगासन पेअर ४) रिदमिक योगासन पेअर स्पर्धा. ही स्पर्धा मुले व मुलींसाठी स्वतंत्र गटात होईल. स्पर्धक एक किंवा दोन योगासन प्रकारात सहभाग घेऊ शकतो. स्पर्धेसाठी वयोगट a) सब ज्युनियर गट  ९ वर्षे ते १४ वर्षे मुले व मुली (जन्मदिनांक ३१-०३-२००९ ते ३०-०३-२०१४ यामधील असावी) b) ज्युनियर गट- १४ वर्षे ते १८ वर्षे मुले व मुली  (जन्मदिनांक ३१-०३-२००५ ते ३०-०३-२००९ यामधील असावी)c) १८ वर्षे ते २८ वर्षे  मुले व मुली   (जन्मदिनांक ३०-०३-२००५ ते ३१-०३-१९९५ ) d) २८ ते ३५ पुरुष व महिला (सिनियर A)*  जन्मदिनांक ३०-०३-१९९५ ते ३१-०३-१९८८ ) e) *३५ते ४५ पुरुष व महिला (सिनियर B)*  जन्मदिनांक ३०-०३-१९८८ ते ३१-०३-१९८८ ) f) ४५ ते ५५ पुरुष व महिला (सिनियर C),  (जन्मदिनांक ३०-०३-१९७८ ते ३१-०३-१९६८ )५) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी पुढील कागदपत्रे सादर करावीत.आधार कार्डची फोटो कॉपी,वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र)
डॉक्टरचे फिटनेस प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जोखीम प्रमाणपत्र. आर्टिस्टिक योगासन पेअर आणि रिदमिक योगासन पेअर मध्ये भाग घेणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
१. पंचांचा निर्णय अंतिम राहील
२. स्पर्धेसाठी अभ्यासक्रम या लिंकवर पहावी.
अधिक माहिती साठी संपर्क
मोहन कवठेकर:- 9850508472
शैलेश कदम:- 9096818800
प्रज्ञा खोत:-9673910081
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.