प्रतिष्ठा न्यूज

आनंदी महाविद्यालयाचे डॉ. संदीप पानारी गुरुवर्य सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आनंदी महाविद्यालय, गगनबावडा येथे कार्यरत असणारे प्रा. डॉ. संदीप पानारी यांनी प्रतिष्ठा फौंडेशन, महाराष्ट्र आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुरुवर्य सन्मान पुरस्कार माजी मंत्री मा. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते एसकेन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे देऊन सन्मानित करण्यात आले.     कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. आर. एस. करांडे हे होते तर या प्रंसगी प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव , पंचायत समितीचे गटविकास आधिकारी मनोज राऊत, सुनिल गुरूव आदी मान्यवर उपस्थित होते डॉ.संदीप पानारी हे गेले पंधरा वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी अनेक विद्यार्थ्यी केंद्रीत कार्यशाळा आणि उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे.  त्यांनी सहा पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांचे वडील, आई, पत्नी, मुले आणि मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले. तसेच, आनंदी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई आणि प्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.