प्रतिष्ठा न्यूज

सदतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून- भिकन अंबे यांची निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार, सायकलिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे सचिव  तसेच राष्ट्रीय सायकलिंग व स्केटिंग प्रशिक्षक भिकन अंबे यांची गोवा येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र  रोड सायकलिंग संघाचे व्यवस्थापक म्हणून सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राकडून निवड झाली आहे.
दि.6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान गोवा येथे या स्पर्धा पार पडणार आहेत. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार- मा. प्रतापजी जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव- प्रा.संजय साठे, चाटे स्कूलचे सचिव- सोमनाथ वाघमारे, मुख्याध्यापक- संतोष महस्के, क्रीडा उपसंचालक- संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी- बाजीराव देसाई, छत्रपती संभाजी नगर जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष- चंद्रशेखर घुगे, दयानंद कांबळे, राधिका अंबे, दीपक जाधव, पंकज बोरसे, अमृत बिऱ्हाडे, विनोद माने, महेश दसपुते,  मनजित सिंग दरोगा, यांनी अभिनंदन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.