प्रतिष्ठा न्यूज

जाकापूर येथे श्री हनुमान मंदिरातअखंड हरिनाम सप्ताह आणि भंडाऱ्याचे आयोजन

प्रतिष्ठान न्यूज / राजू पवार
नांदेड : कंधार तालुक्यातील मोजाकापूर येथे हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक 13 मार्च ते 20 मार्च मार्चपर्यंत करण्याचे आयोजित केले आहे या सप्ताहाच्या काळात दररोज सकाळी काकड आरती संत ज्ञानेश्वर महाराज यांचे हरिपाठ गाथा भजन ,तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण आणि रात्री नऊ ते 11 कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 13 मार्च रोजी ह भ प विकास महाराज दास वाडीकर दिनांक 14 मार्च ह ह भ प शंकर महाराज मसलगाव तर दिनांक 15 मार्च रोजी ह भ प सुर्यकांत महाराज होनवडजकर दिनांक 16 मार्च रोजी ह भ प अरविंद महाराज सोनखेडकर दिनांक 17 मार्च रोजी हभप विष्णू महाराज अंतरकर पैठण ,, दिनांक 18 मार्च रोजी ह भ प बाबा महाराज काकांडी दिनांक 19 मार्च रोजी श्री ह भ प वासुदेव महाराज कोलंबीकर यांचे किर्तन होणार आहे.
तसेच दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 वाजता, श्री ह भ प नामदेव महाराज दापकेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तरी परिसरातील नागरिक भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे समस्त गावकरी मंडळी जाकापूर यांनी आवाहन केले आहे त्याचप्रमाणे दररोज महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे समस्त गावकरी मंडळी यांनी कळविले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.