प्रतिष्ठा न्यूज

ग्राहक पंचायत गगनबावडा आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत ऋतुजा पडवळ व सोनाली खोत प्रथम

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा ता.२७ : २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोल्हापूर जिल्हा-गगनबावडा तालुका शाखेच्यावतीने “तालुकास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२” चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आज निकाल जाहीर करण्यात आला.
अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीव व्हावी, ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहो चावी आणि शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोल्हापूर जिल्हा-गगनबावडा तालुका शाखेच्यावतीने निबंध स्पर्धा-२०२२ चे आयोजन करण्यात आले होते . सदर निबंध स्पर्धा माध्यमिक गट, कनिष्ठ महाविद्यालयीन गट, महाविद्यालय गट अशा तीन गटात आयोजित केलेल्या होत्या.


माध्यमिक विद्यालय गटात (आठवी ते दहावी)
विषय ‘जागो ग्राहक जागो’ यामध्ये माध्यमिक विद्यालय असळज ची ऋतुजा धमाजी पडवळ हिने प्रथम क्रमांक पटकवला . तर परशुराम विद्यालयाची वैष्णवी अविनाश पांगळे हिने दुसरा क्रमांक मिळविला.तर माध्यमिक विद्यालय असळज ची तन्वी अशोक वरेकर हिने तिसरा क्रमांक मिळविला.
उच्च माध्यमिक विद्यालय गटात (अकरावी, बारावी)विषय ‘ ग्राहक जागृतीची गरज ‘यामध्ये
सोनाली वसंत खोत हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर संजना शामराव पाटील व वेदिका अनिल कोटकर यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आला. या तिघीही परशुराम विद्यामंदिर च्या विध्यार्थिनी आहेत.महाविद्यालयीन गटात कोणाचेही लेख आले नाहीत.
तिन्हीही विभागात प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाना अनुक्रमे रु.३०१,२०१, १५१ व रोख रक्कम व प्रशस्ती पत्र तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, गटविकास अधिकारी माधुरी परीट,ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील व अन्य मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सर्व ग्राहक संघटनाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.