प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२७ : आज गगनबावडा येथील तहसीलदार कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे होते.
मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सुप्रिया दळवी, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे प्रा. एस. एन. पाटील, मेघाराणी जाधव, व ग्राहक कल्याण फौंडेशनचे विश्वनाथ पोतदार या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या विविध समस्या मांडल्या. तहसीलदार डॉ.संगमेश कोडे यांनी ग्राहकांच्या समस्या बाबत आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे सांगितले.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत विजयी झालेल्या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन व आभार समारोप पुरवठा अधिकारी वायंगणकर यांनी केला.
यावेळी गटविकास अधिकारी माधुरी परीट, सर्व ग्राहक संघटनांचे जिल्हा व स्थानिक पदाधिकारी, शासकीय निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख, धान्य दुकानदार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.