प्रतिष्ठा न्यूज

कोल्हापूर विभागस्तरीय शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत केपीज चेस अकॅडमी सांगलीच्या खेळाडूंचा डंका

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : दि.१५ व १६ डिसेंबर २०२२ रोजी सिंधुदुर्ग येथे झालेल्या कोल्हापूर विभागस्तरीय शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत, केपीज चेस अकॅडमी विक्रमादित्य चव्हाण , जिया महात, राजप्रिया जंगम,या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांच्या वयोगटात स्थान निश्चित केले.
सदर स्पर्धेत कोल्हापूर विभागातील २४० खेळाडू आंतरराष्ट्रीय नामांकित खेळाडूंसह सहभागी झाले होते. १४ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात विक्रमादित्य चव्हाण  प्रथम क्रमांक, मुलींच्या वयोगटात जिया महात हिने प्रथम क्रमांक पटकावला.तर १४ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात आदित्य चव्हाण याची तर मुलींमध्ये अंकिता नरळे हिची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली.
       १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात हादिन महात, तर मुलीमध्ये सारा हरोले हिची राखीव खेळाडू म्हणून निवड.१९ वर्षाखालील वयोगटात, राजप्रिया जंगम हिने तिसरा क्रमांक प्राप्त केला.
वरील सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजेत्या स्पर्धकांना केपीज चेस अकॅडेमीचे अनुभवी बुद्धीबळ प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच  विजयकुमार माने आणि पौर्णिमा उपळावीकर-माने अनुभवी बुद्धीबळ प्रशिक्षक आणि फिडे पंच यांचे मौलिक मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
या यशाबद्दल क्रीडा अधिकारी सांगली जिल्हा तसेच,
सांगली जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष गिरीशजी चितळे ,चिदंबर कोटीभास्कर उपाध्यक्ष- सांगली जिल्हा बुध्दीबळ संघटना, चंद्रकांत वलवडे सचिव सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना व हितचिंतक यांनी कौतुक केले व पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.