प्रतिष्ठा न्यूज

दुसरी सत्यशोधक विश्व धम्म परिषद रविवारी; भदंत एस. संबोधी थेरो, एस. पी. दीक्षित यांना धम्मसंगिती जीवन गौरव पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुध्दांच्या धम्म विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे रविवार दि. 26 मे, 2024 रोजी सकाळी 11:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी आयोजन करण्यात आल्याची माहिती धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व परिषदेच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लेखक व विचारवंत लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेचे उदघाटन साहित्यिक व विचावंत ॲड. कृष्णा पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी आम्रपाली बुद्ध विहार बुद्धवनचे प्रमुख भदंत एस. संबोधी थेरो, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस. पी. दीक्षित यांना धम्मसंगिती जीवन गौरव पुरस्कार-2024 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते प्रा. शहाजी कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, ज्येष्ठ धम्म अभ्यासिका विजया कांबळे, सुप्रसिद्ध अभिनेते व नाटककार किशोर खोबरे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. टी. के. सरगर, सामाजिक कार्यकर्त्या निती उराडे यांची विशेष सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
सदर परिषदेत विश्वासराव तरटे (कोल्हापूर), प्रा. देवदत्त सावंत (लातूर), चैताली पवार (धुळे), प्रा. सदानंद सुर्वे (वाशिम), प्रा. गुलाब साबळे (वाशिम) यांना राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे, डॉ. नामदेव मोरे, आशा केसरकर, हंबीरराव तरटे, अरहंत मिणचेकर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.