प्रतिष्ठा न्यूज

आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते शिराढोन येथे धनादेश वाटप व कंधार येथे दहा कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

प्रतिष्ठा न्युज/वसंत सिरसाट
उमरा : कंधार तालुक्यातील शिराढोण येथील ग्रामपंचायत कार्यालयात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीमधुन आमदार- शामसुंदर पाटील शिंदे यांच्या हस्ते येथील 3 शेतकऱ्यांची जनावरे दगावली होती म्हणून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.

तसेच आमदार- शामसुंदर पाटील शिंदे शिराढोण मधील अंतर्गत विकास कामाबाबत सरपंच खुशालराव पांडागळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी व्यंकटराव पांडागळे, शामराव कपाळे, ग्रा.पं.सदस्य- सदानंद भुरे, तलाठी- रेनके व गावकरी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

  
 ●दहा कोटी रुपये रस्त्याचे कामाचे भूमिपूजन●
कंधार येथील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता चौपदरी करण करणे कामाचे भूमिपूजन आमदार- शामसुंदर पाटील शिंदे व शेकापच्या महिला प्रदेक्षाध्यक्षा- आशाताई शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
लोहा- कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार- शामसुंदर पाटील शिंदे यांनी या रस्त्याच्या कामासाठी शासन दरबारी मोठे प्रयत्न निधी उपलब्ध केला त्यामुळे कंधार येथील नागरिकांची मोठी समस्या असलेला हा रस्ता चौपदरीकरण झाल्यास दूर होणार आहे.
या रस्ता भूमिपूजन प्रसंगी अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.