प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त नुकसान व बाभळी बंधारा पुनर्वसनाची समस्या जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास

प्रतिष्ठा न्युज/वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त देगलूर, बिलोली, मुखेड, भोकर, मुदखेड, अर्धापूर, धर्माबाद आदी तालुक्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी- अभिजीत राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. पाहणी दौऱ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने निवेदने दिली, आपल्या वेदना मांडल्या, तसेच प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांच्या पाहणी नुसार बाभळी बंधारा पुनर्वसन करणे व नुकसानाची माहिती दिली व शासनाकडून मदतीची अपेक्षाही व्यक्त केली. या सर्व बाबी तपशीलवारपणे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
दि.29 जुलै रोज शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला निवासी जिल्हाधिकारी- महेश वडदकर, अप्पर जिल्हाधिकारी- पी.एच. बोरगावकर आदी वरिष्ठ अधिकारी व माजी पालकमंत्री- डी.पी. सावंत,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार- अमरनाथ राजूरकर, प्रा. रवींद्र पाटील चव्हाण उपस्थित होते. या बैठकीमध्ये शेती व नागरिकांचे झालेले नुकसान तसेच दीर्घकालीन व तातडीच्या मदतीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.
नांदेड शहरातील नदी-नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई झाली नसल्यामुळे व शहरातील अनेक भागांमध्ये अतिक्रमणे असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे नांदेड शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले अशी अतिक्रमणे निश्चित करावी यावर चर्चा झाली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.