प्रतिष्ठा न्यूज

अंतर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी विलिंग्डन महाविद्यालयातील खेळाडूंची निवड*

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे सांगली विभागीय मैदानी स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये विलिंग्डन महाविद्यालयातील खेळाडू विशाल शिंदे बीए भाग २ याने ११० मीटर हार्डल्स क्रीडा प्रकार मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तर स्नेहल सरगर बी.ए. भाग १ हिने तिसरा क्रमांक मिळविला. तसेच खुशी भोसले बी.ए.भाग एक हिने उंच उडी क्रीडा प्रकार मध्ये तिसरा क्रमांक मिळविला याबद्दल खेळाडूंचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुरेश कुंभार उपप्राचार्य डॉ. आर.ए. कुलकर्णी जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. राजू कांगणे महाविद्यालयाचे रजिस्टार हणमंत उपळावीकर उपस्थित होते. सदर खेळाडूंना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे रामकृष्ण पटवर्धन व उपप्राचार्य डॉक्टर एस.जी. कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले तर डॉ. गणेश सिंहासने, योगिता परमने व अशोक आंबोळे यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.