प्रतिष्ठा न्यूज

मिरजेतील सराईत गुन्हेगार गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीवर मोक्का

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज, हद्दीतील सराईत गुन्हेगार गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक बसवराज तेली म्हणाले, गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन याने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या हद्दीत एक संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण केली आहे. गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन व टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजिवीकेसाठी कोणताही कायदेशीर समाजमान्य कामधंदा करीत नाहीत. या टोळीचे कार्यक्षेत्र मिरज शहर व एम. आय. डी. सी. कुपवाड मधील भारतनगर, १०० फुटी रोड, ईदगाहनगर, अलंकार कॉलनी, सुंदरनगर, मिरज रेल्वे स्टेशन, शिवाजी रोड, खतीबनगर, मंगळवार पेठ, कैकाडी गल्ली, कर्मवीर भाऊराव चौक, कुपवाड रोड, भारत सुतगिरणी रोड, पालवी हॉटेल, मेमन पिस्टन चौक एम. आय. डी. सी. कुपवाड वगैरे आजुबाजुचे परिसरात आहे. टोळीप्रमुख १) गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन वय २८ वर्षे रा. धनगर गल्ली बुधवार पेठ मिरज. सध्या रा. सुभाषनगर मिरज याने २) समर्थ संजय गायकवाड वय १८ रा. हाडको कॉलनी १०० फुटी रोड मिरज ३) जावेद बंडुखान शेख वय २७ वर्षे, धंदा मजुरी रा. झारी मस्जीद पाठीमागे, मिरज ४) कुणाल दिनकर वाली रा. म्हाडा कॉलनी, मिरज (परागंदा) यांनी सन २०१८ पासुन सन २०२२ पर्यंत आज अखेर सतत गुन्हयांची मालिका केली आहे. या टोळीचे विरुध्द घातक हत्याराने जबर दुखापत करून जबरी चोरी करणे, दहशत निर्माण करून खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, बनावट नोटा कब्जात बाळगुन त्याची विक्री करणे, अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, जबर दुखापतीची भिती घालुन बेकायदेशीर जमाव जमवुन निष्पाप लोकांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून नुकसान करणे, विनयभंग करणे, इत्यादी शिर्षकाखाली गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत. ही टोळी आर्थिक फायद्याचे जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करीत असुन मिरज व आजुबाजूचे परिसरात या टोळीने त्याची दहशत निर्माण केलेली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज जि. सांगली गु.र.नं. ३१२ / २०२२ भा.द.वि.सं. कलम ३९४, ३४१, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ या गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (II), ३ (२), ३(४) अन्वये वाढीव कलमे लावुन तपास करणेबाबतचा प्रस्ताव महात्मा

गांधी चौक पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक, रविराज फडणीस यांनी डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, सांगली यांना सादर केला होता. अपर पोलीस अधीक्षक सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन सदरचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांचेकडे मोक्का कायद्यान्वये तपास करणेची मंजुरी मिळणेकामी पाठविला होता. .

मा. श्री. मनोज लोहिया, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन मोक्का कायद्यान्वये तपासाची मंजुरी दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास

श्री. अशोक विरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सतीश शिंदे पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ. शाखा, सांगली. सपोनि श्री. रविराज फडणीस, पो.उप निरीक्षक श्री प्रमोद खाडे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, सपोफौ सिध्दाप्पा रुपनर, सपोफौ / उदय कुलकर्णी, पोकॉ/दिपक गट्टे, स्था.गु.अ.शाखा, सांगली. मपोना / स्वाती बामणे (कासुगडे), पोकॉ/गणेश कोळेकर व महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.