प्रतिष्ठा न्यूज

घरफोडी करणारा आरोपी अटक; १,६६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त; सांगली शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगीरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : घरफोडी करणारा आरोपी अटक करण्यात आला असून त्याच्याकडून एकुण १,६६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगीरी केली.  गोविंदा भिमाप्पा बंडीवडर वय-२१ वर्षे, रा. सागंली एस.टी. स्टॅन्ड मागे पत्रकारनगर, गणेशनगर, सागंली असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

*गुन्हयाची थोडक्यात हकीकत*

मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे साो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मँडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हयाचे घटनास्थळी लागलीच भेट देवून गुन्हे उघडकीस आणुन आरोपी यांना अटक करणेचे आदेश देणेत आले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे.

दि-३१/०६/२०२४ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील

पोकॉ/१६१४ सुमित सुर्यवंशी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम शिवशंभो चौक सांगली येथे चोरीचा कॅमेरा व कैमेरा लेन्स विक्री करणेकरीता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळालेने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन वॉच केला असता एक इसम बायपास रोड येथे संशयीतरित्या फिरताना मिळुन आल्याने व तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात वरील गुन्हयात चोरीस गेलेला वरील वर्णनाचा व किंमतींचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर मुद्देमालाबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तरी सदर आरोपीत यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/५४८ सचीन शिंदे सागंली शहर पोलीस ठाणे हे करित आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव साो. यांचे मार्गदर्शानाखाली मा. संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पो. ठाणे यांच्या आदेशानुसार १) पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, २) पोहेकौँ / ५३९ मच्छिद्र बर्डे ३) पोहेकाँ/५४८ सचीन शिंदे ४) पोहेकौं /१७६३ संदिप पाटील ५) पोहेकॉ/४४० संदीप पाटील ६) पोकों / १०३२ संतोष गळवे, ७) पोकॉ/७९३ गौतम कांबळे ८) पोकों/२४२४ संदीप कुंभार ९) पोकॉ/१०७० योगेश सटाले १०) पोकों / १६१४ सुमित सुर्यवंशी, ११) पोकॉ/१६२५ पृथ्वीराज कोळी

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.