प्रतिष्ठा न्यूज

सोमवारपर्यंत तासगाव तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करा अन्यथा मंगळवारी आंदोलन करणार..राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निवेदन..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगांव तालुक्यामध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरु असून त्याचा नाहक त्रास तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक,विदयार्थी,विद्यार्थीनींना होत असून या अवैध धंद्यास वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे.तरी आपल्या तालुक्यातील सर्व अवैध धंदे सोमवार दि २७/०५/२०२४ अखेर पर्यंत बंद न झाल्यास मंगळवार दि. २८/०५/2028 रोजी युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल तरी या आंदोलनामुळे निर्माण होणान्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास आपण जबाबदार रहाल असे निवेदन तासगाव पोलीस स्टेशनला दिले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.