प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद – ५२,२००/- रु चा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून त्याच्याकडून ५२,२००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली.  दिपक संगिता गंगाप्पा आवळे, वय २१ वर्षे, रा. गुलाब कॉलनी, पाण्याचे टाकीजवळ, १०० फुटी रोड, सांगली. असे संशयिताचे नाव आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोफौ. अनिल ऐनापुरे व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. २५/०५/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोफौ. अनिल ऐनापुरे यांचे पथक इरझेड चौक, धामणी रोड, विश्रामबाग मध्ये पेट्रोलीग करीत असताना, सपोफौ. अनिल ऐनापुरे यांना विश्रामबाग पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील आरोपी नामे दिपक आवळे हा पाठीवर सॅक अडकवून चालत चाललेला दिसला. त्यांचा संशय आलेने सपोफौ. अनिल ऐनापुरे व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव दिपक संगिता गंगाप्पा आवळे, वय २१ वर्षे, रा. गुलाब कॉलनी, पाण्याचे टाकीजवळ, १०० फुटी रोड, सांगली असे असलेचे सांगितले. सपोफौ. अनिल ऐनापुरे यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पाठीवरील अडकवलेल्या सॅकमध्ये वरील वर्णनाचे चांदीचे व इमिटेशनचे दागिने मिळुन आले. त्यास सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सपोफौ. अनिल ऐनापुरे यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागिंतले की, त्याचेजवळ मिळुन आलेले चांदीचे व इमिटेशनचे दागिने हे ७ ते ८ दिवसापुर्वी राजमती शाळेच्या पाठीमागे बंद असलेल्या बंगल्यामध्ये घरफोडी चोरी केली होती, त्यातीलच हे दागिने असल्याची कबूली दिली.

सदर बाबत विश्रामबाग पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील चांदीचे व इमिटेशनचे दागिने पुढील तपास कामी सपोफौ. अनिल ऐनापुरे यांनी पंचासमक्ष जप्त केले. दिपक आवळे हा रेकार्डवरील आरोपी असून यापुर्वी त्याचेवर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.

*जप्त मुद्देमाल*
४२,०००/- रु. किंमतीचे ४७२ ग्रॅम वजनाचे दागिने त्यात चांदीचा छल्ला, नाणी ४ पैजन, कुकंवाचा करंडा, असे जु. वा. किं. अं.
५,०००/- रु. किंमतीचे ए. बी. एस. कंपनीचे घड्याळ असे जु. वा. किं. अं.
४,७००/- रू. किंमतीचे इमिटेशन ज्वेलरी सेट त्यात चैन, ब्रेसलेट, कानातील रिंगा, हातातील कडा असे जु.वा.किं.अं. ४. ५००/- रु. किंमतीची धातूची अंगठी त्यावर साईबाबांचा फोटो असलेली जु.वा.किं.अं. ५२,२००/- (बावन्ना हजार दोनशे रुपये)

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
सपोफौ / अनिल ऐनापुरे, पोहेकॉ / इम्रान मुल्ला, पोशि/ विनायक सुतार, रोहन घस्ते, अभिजीत ठाणेकर, सुरज थोरात, स्था.गु.अ.शाखा पोना/ श्रीधर बागडी, पोशि / अजय पाटील, विवेक सांळुखे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, सायबर पोलीस ठाणे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.