प्रतिष्ठा न्यूज

आरटीआय कार्यकर्ते संतोष कदम खुन प्रकरणी संशयित आरोपीस अटक ; एलसीबी सांगली यांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथील आरटीआय कार्यकर्ते संतोष कदम यांच्या कुरूंवाड येथे झालेल्या खुन प्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली. सिध्दार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर, रा. शिवभारत चौक, सांगलीवाडी, सांगली. असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ०७/०२/२०२४ रोजी मयत इसम नामे संतोष कदम यांना ठार मारण्याचे उद्देशाने काही अज्ञात इसमांनी कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी नेवून त्याचेवर चाकूने तोंडावर, मानेवर, छातीवर व दोन्ही हातावर गंभीर जखमा करून त्याचा खुन केला तसेच त्याचा मृतदेह हा स्वीफ्टकारमध्ये नांदणी ते कुरूंदवाड रोडवरील गॅस गोडावून जवळ मिळून आला होता. सदर बाबत कुरूंदवाड पोलीस ठाणे, कोल्हापुर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. ०७/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल झालेपासुन आजपर्यत नमुद आरोपी हा पोलीसांना गुंगारा देवून अद्यापपर्यत फरार होता. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांचे सांगली जिल्हा भेटीदरम्यान नमुद गुन्हयाचे फिर्यादी व मयताचे नातेवाईक यांनी त्यांची भेट घेवून आरोपींताना लवकरात लवकर अटक करणेबाबत विंनती केली होती. सदर गुन्हा संवेदनशिल असलेने त्याचे गांभीर्य ओळखुन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर श्री. सुनिल फुलारी सर यांनी कोल्हापुर व सांगली मधील संबधित पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावून सदर गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत आदेशीत करुन त्याबाबत वेळोवेळी आढावा घेवून मार्गदर्शन केले होते.
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत आदेशित केले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदर पाहिजे आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असताना पोहेकॉ / दिपक गायकवाड यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत कुरुंदवाड येथील वरील दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर, रा सांगलीवाडी हा कागल येथे असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.
मा. वरीष्ठांच्या आदेश व निर्देशाप्रमाणे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेणेकरीता कागल पोलीस ठाणेस हजर होवून तेथील मदत घेवून मिळाले बातमीप्रमाणे कागल मध्ये सापळा रचून आरोपीचा शोध घेतला असता, तो नमुद पोलीस पथकास कागलमध्ये मिळून आला.
लागलीच सदर आरोपीस ताब्यात घेवून कागल पोलीस ठाणेस माहिती देवून सदर आरोपीस पुढील तपास कामी गुन्हयाचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे, इचलकरंजी, जि. कोल्हापुर यांचे ताब्यात दिला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी हे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
पोहेकॉ / दिपक गायकवाड, संजयनगर पोलीस ठाणे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर श्री. सुनिल फुलारी मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, पोहेकों/ दिपक गायकवाड, संजयनगर पोलीस ठाणे. पोहेकॉ / बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, अरुण पाटील, पोना / संदीप नलावडे, पोशि / विनायक सुतार, स्था.गु.अ.शाखा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.