प्रतिष्ठा न्यूज

शिक्षणाचा धंदा झाल्याने गुणवत्ता ढासळली : भिमराव धुळूबुळू : भीमराव धुळूबुळू ; कोचिंग क्लासेस टिचर्स असोसिएशन व सोशल फोरमच्या गुणवंत पाल्याच्या सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : शिक्षणाचा धंदा झाल्याने गुणवत्ता ढासळली.असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी कोचिंग क्लासेस टिचर्स असोसिएशन व सोशल फोरमच्या गुणवंत पाल्याच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना काढले.बदलत्या कालखंडात शिक्षकांनी संघटीत झाले पाहिजे. स्वतच्या आत्मप्रौढीत रमण्यापेक्षा इतर जगातले बदल व त्यासंदर्भातले ज्ञान आत्मसात केले पाहिजे .
तर प्रा बसवराज हिरेमठ यांनी संघटन ही शक्ती असून संघटित राहून आपल्या व्यवसायावर येणा-या संकटावर आपण मात केली पाहिजे .
यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष रावसाहेब हल्लोळे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.तर राज्याचे विशेष सल्लागार प्रा.संजय कुलकर्णी,राज्याचे समन्वयक प्रताप गस्ते,राज्य उपाध्यक्ष सुधाकर सावंत .राज्याचे मुखपत्र गुरुवाणीचे संपादक रवी बावडेकर माजी अध्यक्ष आर बी पाटील ,गणेश जोशी अादी मान्यवरांचे हस्ते .संघटनेच्या सदस्यांच्या गुणी पाल्यांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला.यामध्ये चार्टर्ड अकौंटट मल्हार जोशी,धन्वंतरी शुभम सावंत ,रंगकर्मी मयूरेश पाटील आदी पाल्यांसह अनेक परीछात यश मिळवणारे गुणवंत होते.
सुरवातीस मकरंद उपळावीकर यांनी स्वागत केले. कार्यवाह राजू पाटील यांनी अहवाल चाचन केले.खजिनदार सुनिल कुलकर्णी यांनी अर्थिक लेखाजोखा मांडला तर राज्यउपाध्यक्ष सुधाकर सावंत यांनी राज्यसंघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचलन वनिता मोहीते व समन्वयक सुर्यकांत तवटे यांनी केले. रावसाहेब यमगर, चौगुले,आदींनी संयोजन केले.
गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना भीमराव धुळूबुळू ,बसवराज हिरेमठ,प्रताप गस्ते ,संजय कुलकर्णी ,सुधाकर सावंत ,रवी बावडेकर , रावसाहेब हल्लोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.