प्रतिष्ठा न्यूज

ज्या बॅंका युवकांना कर्ज देण्यासाठी साठी टाळा टाळ करतील त्या बॅकाच्या दारात ढोल वाजवू : वसंतराव मुळीक

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : अखिल भारतीय मराठा महासंघाची शाहूवाडी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव गराडे होते.
आपल्या प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी तालुक्यातील कामाचा आढावा घेतला. या बैठकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आढावा घेत युवकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक उत्कर्षासाठी प्रयत्नशील रहाणेसह शाखा विस्तार, आरक्षणाबरोबर अन्य मुलभूत प्रश्रावर चर्चा केली व ज्या बॅका समाजातील युवकांना रोजगार साठी कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करतील, अशा बॅंकाच्या दारात ढोल वाजविण्याचे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष अवधुत पाटील, जिल्हा चिटणीस प्रताप नाईक, बापू चव्हाण, अर्जुन पाटील, बाबासो पाटील, सदाशिव फडतारे, विजय चिखलकर, राम पाटील, बी एस पाटील यांच्या सह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी आभार तालुका कार्याध्यक्ष अमर पाटील यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.