प्रतिष्ठा न्यूज

जोर स्पर्धेत शुभम चव्हाण प्रथम : 10 मिनिटात मारले 335 जोर श्री समर्थ व्यायाम शाळेत दासनवमी उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री समर्थ व्यायाम शाळा येथे श्री रामदास नवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला, दास नवमी निमित्त मोठा गट व लहान गट अशा दोन गटात जोर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.स्पर्धेचे उद्घाटन योगशिक्षक सतिश गाडगीळ यांनी श्रीफळ वाढवून केले.
स्पर्धेमध्ये श्री समर्थ व्यायाम शाळा,सरकारी तालीम,सांगलीवाडि येथील खेळाडूंनी भाग घेतला होता.स्पर्धा उत्साहात पार पडल्या.स्पर्धेचा बक्षिस समारंभ प्रख्यात डॉ. शिरीष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला. विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षिस देण्यात आले.संस्थेचे सचिव रामकृष्ण चितळे (आंतरराष्ट्रीय पंच शरीरसौष्ठव) यांनी स्पर्धा संयोजन केले.
स्पर्धेचा निकाल –
मोठा गट – (10 मिनिट जोर स्पर्धा)
प्रथम क्रमांक – शुभम चव्हाण (335 जोर)
द्वितीय क्रमांक – अक्षय कांबळे (279 जोर)
तृतीय क्रमांक – धीरज कुमार कोळी (268 जोर)
चतुर्थ क्रमांक – संतोष तांबट (240 जोर)
लहान गट – (5 मिनिट जोर स्पर्धा)
प्रथम क्रमांक – सनि केवट (143 जोर)
द्वितीय क्रमांक – पार्थ सिद्द (110 जोर)
संतोष तांबट 16 वर्षे सलग स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत.
दुपारी मंत्रजागर आणि सायंकाळी रसपान होऊन दासनवमी संपन्न झाली.
यावेळी गुरुनाथ कुलकर्णी, माधवराव कुलकर्णी, बापू हरिदास, हरी महाबळ, वैभव माईणकर, मिलिंद चितळे, सुहास व्हटकर,संजय पाटिल, वैभव केळकर, अरविंद करंदीकर,संजीव बर्वे, सुनिल कानेटकर आदि मान्यवर आणि व्यायामपट्टू उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.