प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

प्रधानमंत्री किसान योजनेचा 13 हप्ता आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार

प्रतिष्ठा न्युज/वसंत सिरसाट
नांदेड : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री (पीएम) किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे वितरण दिनांक 27 फेब्रुवारी, 2023 रोजी होणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
आधार सिडींग प्रलंबित लाभार्थीची बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँक( आयपीपीबी) मध्ये अर्थात भारतीय डाक विभागाच्या मार्फत उघडण्यात येत आहेत.त्या करीता सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले खातेइंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) मध्ये आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे. तेव्हा आयपीपीबी मध्ये नव्याने उघडल्यावर पुढील 48 तासांत ती आधार संलग्न होऊन सक्रिय होतील.
यास्तव सर्वांना विनंती आहे की प्रत्येक गावोगावी दवंडी देऊन, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी देऊन प्रलंबित लाभार्थीची बँक खाती (आयपीपीबी) मध्ये उघडण्यात यावीत म्हणजे हे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.असे केंद्र सरकारच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.