प्रतिष्ठा न्यूज

धनजी तांडा येथील जेष्ठ नागरिक शेषराव राठोड यांचे दुःखद निधन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील धनजी तांडा उमरा येथील जेष्ठ नागरिक शेषराव सोमलू राठोड वय वर्षे- 70 यांचे आज दि.30 जुलै 2023 रोज रविवारी दुपारी हृद विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर दि.31 जुलै रोजी सकाळी ठिक 10 वाजता धनजी तांडा, उमरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. शेषराव राठोड यांचे पश्चात पत्नी, 3 मुले, 2 मुली, नातु, पणतू असा मोठा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या कै. शेषराव राठोड यांच्या दुःखद निधन झाल्याने उमरा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ते लक्ष्मण राठोड, उद्देश राठोड, किरण राठोड, यांचे वडील होत.
 ●प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.