प्रतिष्ठा न्यूज

तासगावात श्री दुर्गामाता महादौड हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न : हिंदू एकतेचे विराट दर्शन…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : देव,देश,धर्म रक्षणासाठी गेली नऊ दिवस सुरु असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या श्री दुर्गामाता दौडीची आज हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत महादौडीने सांगता झाली.या दुर्गामाता महा दौडीचे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळी शिवतीर्थावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून आरती होऊन ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र झाल्यानंतर या महादौडीस प्रारंभ झाला.पारंपारिक वाद्यांच्या गजरात भगवा ध्वज घेऊन हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत निघालेल्या दौडीचे पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले.रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी काढून स्वागत करून महिलांनी भगव्या ध्वजाचे पूजन करून पंचारतीने औक्षण केले.आजच्या या महादौडीत लहान मुले,तरुण,जेष्ठ धारकरी,तरुणीसह,महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय,जय श्रीराम,भारत माता की जय,अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी प्रत्येक धारकरी डोक्यावर भगवा फेटा,भगवी पांढरी टोपी आणि कपाळी भगवा टिळा लावून सहभागी झाला होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.