प्रतिष्ठा न्यूज

पशुपक्ष्यांच्या जीवन समृद्धीसाठी वृक्ष लागवडीची गरज : तहसिलदार बी.जे.गोरे

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : ‘पशुपक्ष्यांच्या जीवन समृद्धीसाठी वृक्ष लागवडीची गरज असून त्यासाठी मानव जातीने परिश्रम घेतले पाहिजेत’, असे मत, गगनबावडा तहसीलदार
बी.जे.गोरे यांनी व्यक्त केले.ते पद्मश्री डॉ.ग.गो.जाधव महाविद्यालय, गगनबावडा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना, प्राचार्य डॉ. टी.एम.पाटील म्हणाले की, ‘असह्य तापमान वाढ, जमिनीची धूप अशा कारणामुळे जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. तो थांबवण्यासाठी समाजातील घटकांनी जाणीवपूर्वक वृक्षारोपण व संवर्धन केले पाहिजे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचेही संरक्षण केले पाहिजे’.
या कार्यक्रमासाठी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. सतीश देसाई, सचिव डॉ.सौ.विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमात नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. अरुण गावकर यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. आदिनाथ कांबळे यांनी तर, आभार उपप्राचार्य डॉ. संदीप पानारी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयीन प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी सहभागी होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.