प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या महास्वच्छता अभियानात राबले हजारो हात महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेश खाडे, आयुक्त गुप्ता यांनीही घेतला सहभाग

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या केंद्र शासनाच्या स्वच्छता अपनाओ विमारी भगावो अभियानांतर्गत आयोजित महास्वच्छता अभियानात हजारो हात राबले. महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेश खाडे, आयुक्त शुभम गुप्ता यांनीही सहभाग घेत स्वच्छता केली. जून चार ठिकाणी आयोजित या विशेष महास्वच्छता अभियानात 280 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

यानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात आयोजित स्वच्छता मोहिमेत
पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे , महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपआयुक्त वैभव साबळे यांचेसह मनपाचे अधिकारी ,कर्मचारी स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानमध्ये सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छता अपणावो बिमारी भगावो, एक पेड मा के नाम अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील चौक सांगली येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा मध्ये परिसर, नागराज कॉलनी, अभय नगर, आरोग्य केंद्र कुपवाड येथे स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले, या मध्ये मनपा कर्मचारी अधिकारी व स्वयंसेवी संस्था याचा सहभाग होता. 2500 पेक्ष्या जास्त कर्मचारी अधिकारी संस्था सदस्यांनी सहभाग घेऊन अभियान यशस्वीपणे राबविले आहे . या अभियानात सहभाग आणि स्वच्छता विषयक काम करीत असल्याबद्दल वालचंद कॉलेज आर्ट सर्कलचे विद्यार्थी, महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण आणि निर्धार फाउंडेशनचे राकेश दड्डेनावर उत्स्फूर्त यांचा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या मोहिमेत साधारणपणे 280 टन कचरा उचलण्यात आला आहे. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, लेखाधिकारी अभिजीत मेंगडे, वित्त अधिकारी स्वप्नील हिरगुडे , नकुल जकाते , जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, वैभव वाघमारे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.